कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची सिद्धता चालू

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका

सांगली – राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने गंभीर स्वरूप धारण केले असून रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. आरोग्य यंत्रणा या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास अपुरी पडत असल्यामुळे मृत्यूदर अधिक आहे. या सर्वांचा विचार करून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने येणार्‍या तिसर्‍या लाटेचा सामना करण्याची सिद्धता चालू केली आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा लहान मुलांवर अधिक परिणाम होणार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. त्या अनुषंगाने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी आयुक्त कार्यालयात बालरोगतज्ञांची बैठक घेतली. महापालिका क्षेत्रात ‘टास्क फोर्स’, ‘हेल्पलाईन’ आणि ‘चाईल्ड केअर सेंटर’ चालू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तिसर्‍या लाटेचा सामना करावा लागलाच, तर सर्व बालरोगतज्ञांनी महापालिकेला साहाय्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले.