निवडणूक जिंकण्यासाठी देश-विदेशातील नेत्यांनी दिलेली अचाट आश्‍वासने !

निवडणूक ही भारतातील असो किंवा विदेशातील, मतदारांनी आपल्यालाच मते द्यावी, यासाठी प्रत्येक उमेदवार विविध प्रयत्न करतो. असे करतांना जगभरातील अनेक नेत्यांनी अशक्यप्राय आश्‍वासने दिली आहेत. त्यातील काही पुढीलप्रमाणे –

प्रतीकात्मक छायाचित्र

१. तमिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यात ए.एम्. शेख दाऊद नावाच्या एका अपक्ष उमेदवाराने निवडणुकीच्या वेळी नागरिकांना आश्‍वासन दिले होते की, ते जर खासदार म्हणून निवडून आले, तर प्रत्येक कुटुंबाला प्रतिमास १० लिटर ब्रँडी (औषधीय उपयोगासाठी) देतील.

२. राजस्थानमधील सोजत येथे शोभा चौहान या महिला उमेदवाराने मतदारांना आश्‍वासन दिले होते की, ती त्यांच्या परंपरांशी तडजोड होऊ देणार नाही. बालविवाह हा त्यांच्या परंपरेचा भाग आहे. त्यामुळे त्या निवडून आल्यास पोलिसांना बालविवाहावर कारवाई करता येणार नाही.

३. झिम्बॉव्वेच्या ‘झानू-पी.एफ्.’ या पक्षाने वर्ष २०१८ मध्ये राष्ट्रीय निवडणुकीच्या वेळी त्यांच्या घोषणापत्रात आश्‍वासन दिले होते की, निवडून आल्यावर ते ५ वर्षांच्या आत १५ लाख घरे बांधून देतील. जे प्रत्यक्षात होणे अशक्य होते.

४. अमेरिकेचे वरिष्ठ रिपब्लिकन नेते न्यूट गिंग्रिच वर्ष २०१२ मध्ये ‘वर्ष २०२० पर्यत चंद्रावर जागा घेऊन तेथे लोकवस्ती वसवण्यात येईल’, असे लोकांना आश्‍वासन दिले होते.

५. वर्ष १९७९ मध्ये ब्रिटीश निवडणुकांच्या वेळी नॉटिग्हॅम हिल्स येथून उभे राहिलेले उमेदवार डेव्हिड बिशप यांनी म्हटले होते की, सत्तेत आल्यानंतर ते चिनी सेनेकडून तिबेट काढून घेणार.

६. वर्ष २०१२ मध्ये अमेरिकेच्या वर्मिन सुप्रिम नावाच्या एका कलाकाराने आश्‍वासन देतांना म्हटले होते की, निवडून आल्यास ते प्रत्येक कुटुंबाला घोड्याचे तट्टू देतील.