
ठाणे, १५ एप्रिल (वार्ता.) – विवाहाचे नाटक करून पतीकडून दागिने आणि पैसे घेऊन फसवणूक करणार्या तरुणीला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने काही तरुणांची फसवणूक केल्याचे समजते. भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाण्यात रिना देवरे या २३ वर्षीय तरुणीच्या विरोधात पतीने गुन्हा प्रविष्ट केला आहे. तिच्यासमवेत आई मंगला देवरे आणि मावशी सुनीता माहिरे यांनाही अटक करण्यात आली आहे. ही तरुणी लग्न करून पसार झाल्यावर तिची आई आणि मावशी तिला साहाय्य करत असत. आरोपींना न्यायालयात उपस्थित केले असता १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश