नक्षलवाद्यांशी लढतांना हुतात्मा झालेल्या सैनिकांवर आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट लिहिणार्‍या लेखिकेला अटक !

(म्हणे) ‘वेतन घेणारे कामाच्या वेळी मरत असतील, तर हुतात्मा कसे ?’

  • सैनिकांच्या हौतात्म्यावर अशा प्रकारे प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून एकप्रकारे नक्षलवादी आणि आतंकवादी यांचे समर्थन करणार्‍या अशा राष्ट्रघातकी मनोवृत्तीच्या लोकांना प्रथम कारागृहात डांबणे आवश्यक !
  • अशी मानसिकता असणार्‍यांना नक्षलवादी आणि आतंकवादी यांच्या विरोधात लढण्यासाठी संवेदनशील ठिकाणी पाठवून देण्याची मागणी कुणी केल्यास चुकीचे ठरू नये !
नक्षलवाद्यांसमवेतच्या चकमकीत हुतात्मा सैनिक

रायपूर (छत्तीसगड) – वेतन घेणारे कामगार जर कामाच्या वेळी मरत असतील, तर त्यांना ‘हुतात्मा’ कसे म्हणू शकतो ? याच आधारे जर वीज विभागातील कर्मचारी जो विजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडतो त्यालाही ‘हुतात्मा’ म्हटले पाहिजे. प्रसारमाध्यमांतील लोकांनी भावूक बनू नये, अशी आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट केल्याच्या प्रकरणी आसाम पोलिसांनी ४८ वर्षीय लेखिका शिखा सरमा यांना देशद्रोहासह अन्य गुन्ह्यांच्या अंतर्गत अटक केली आहे. सरमा यांनी नुकतेच छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांसमवेतच्या चकमकीत हुतात्मा झालेल्या २२ सैनिकांच्या हौतात्म्यावर वरील प्रकारे प्रश्‍न उपस्थित केला होता. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे अधिवक्ता उमी डेका बरुआ आणि कंगकना गोस्वामी यांनी दिसपूर पोलीस ठाण्यात सरमा यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना अटक केली.