पुणे शहरात ५ ठिकाणी २४ घंटे लसीकरण केंद्र चालू रहाणार !

प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे – शहरात सध्या १०४ ठिकाणी लसीकरण चालू आहे. प्रतिदिन अनुमाने १८ सहस्र नागरिकांना लस देण्यात येत आहे. महापालिकेचे राजीव गांधी रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालय आणि नायडू रुग्णालय या ठिकाणी रात्री १० पर्यंत लसीकरण केले जात आहे. केंद्र सरकारने २४ घंटे लसीकरण करण्यासाठीचे आदेश दिले असले, तरी सध्या ‘नाईट कर्फ्यू’ लागू असल्याने केवळ कोरोनायोद्धे आणि आरोग्य कर्मचारी यांनाच रात्री लस घेणे शक्य होणार आहे; मात्र लवकरच त्यात पालट केला जाणार आहे, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सांगितले.