रामनाथी आश्रमात ललिता त्रिपुरसुंदरीदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन झाल्यानंतर तिचे दर्शन घेतांना आलेली अनुभूती

ललिता त्रिपुरसुंदरीदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन झाल्यावर मूर्तीचा वरचा (हातापर्यंतचा) भाग कुंकवाने झाकलेला असणे, तेथे ध्वजाचा आकार दिसणे आणि ‘हा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा ध्वज आहे अन् लवकरच हिंदु राष्ट्र येणार आहे’, असे देवी म्हणत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे

सौ. मिथिलेश कुमारी

‘रामनाथी आश्रमात ललिता त्रिपुरसुंदरीदेवीच्या मूर्तीवर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कुंकुमार्चन केले. विधी पूर्ण झाल्यानंतर मी दर्शन घेण्यासाठी गेले होते. तेव्हा मला देवीची संपूर्ण मूर्ती कुंकवाने झाकली असून केवळ तिचे दोन डोळे आणि आशीर्वाद देणारा हात एवढेच दिसत होते. मूर्तीचा वरचा (हातापर्यंतचा) भाग कुंकवाने झाकला होता. ‘त्यामुळे तेथे ध्वजाचा आकार आहे’, असे दिसत होते आणि देवीमाता ‘हा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा ध्वज आहे आणि लवकरच हिंदु राष्ट्र येणार आहे’, असे म्हणत असल्यासारखे वाटत होते. त्या वेळी माझी भावजागृती झाली आणि मी ललिता त्रिपुरसुंदरीदेवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.’

– सौ. मिथिलेश कुमारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.५.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक