तुजविण नाही कुणी मजला देवा ।
प्रभु तुजविण नाही कुणी मजला देवा ॥ १ ॥
आस धरली तुझीच देवा ।
संकटसमयी स्मरण तुझेच देवा ॥ २ ॥
दुःखात करणार तुझाच धावा मी देवा ।
तुझे अखंड स्मरण व्हावे ।
म्हणून मागते दुःख मी देवा ॥ ३ ॥
आस नाही धरली सुखाची देवा ।
प्रारब्ध भोगण्यास शक्ती तूच देणार देवा ॥ ४ ॥
तुझ्या चरणांची कास धरली देवा ।
तुजविण मजला नाही कुणाचा आधार देवा ॥ ५ ॥
या अज्ञानी जिवाला लागली ओढ । तुझ्या चरणी येण्याची देवा ।
तूच माता, तूच पिता, बंधू-सखा तूच देवा ॥ ६ ॥
उरली नाही आस कुणाची देवा ।
तुझ्या चरणी मजला ठाव द्यावा देवा ॥ ७ ॥
भाग्यवान आहे भगवंता । या जन्मात तू भेटलास देवा ।
सोडणार नाही धरलेला तुझा हात मी देवा ॥ ८ ॥
भाव, भक्ती, श्रद्धा, तळमळ वाढवी तूच देवा ।
हेच मागणे तुझ्या चरणी देवा ।
कोटीशः कृतज्ञता अर्पिते तव चरणी देवा ॥ ९ ॥
– श्रीमती उषा बडगुजर, जळगाव (१६.२.२०१८)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |