मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपी निकिता जेकब हिला अंतरिम जामीन संमत

देहली येथील शेतकरी आंदोलनाच्या रूपरेषेतील पालट सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याचे प्रकरण

निकिता जेकब

मुंबई – देहली येथील शेतकरी आंदोलनाचे ‘टूलकिट’ शेअर केल्याच्या प्रकरणातील आरोपी निकिता जेकब हिला मुंबई उच्च न्यायालयाने ३ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन संमत केला आहे.

देहली पोलिसांनी निकिता हिच्या विरोधात काढलेले अजामीनपात्र अटकेचे वॉरंट रहित करावे, यासाठी तिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. २५ सहस्र रुपये दंड आणि २५ सहस्र रुपये जामिनावर न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन संमत केला आहे.