
मुंबई – देहली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी विविध चित्रपट कलाकार आणि क्रिकेट खेळाडू यांनी केलेल्या ट्वीटची चौकशी केली जाईल. केंद्र सरकारच्या दबावाखाली येऊन त्यांनी ट्वीट केले का ? याची पडताळणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी येथे दिली. या संदर्भात काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याचा गुप्तहेर विभाग याची चौकशी करणार आहे.
पॉप गायिका रिहाना, पर्यावरणवादी ग्रेटा थॅनबर्ग आणि पॉर्न स्टार मिया खलिफा यांनी ट्वीट केल्यावर भारतातील लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांसह अनेक क्रिकेटपटू आणि कलाकार यांनी ट्वीट केले होते. भारताविरुद्ध प्रचाराचा भाग होऊ नका !, असे अभिनेता अजय देवगण यांनी, तर अर्धसत्य धोकादायक असते !असे ट्वीट अभिनेता सुनील शेट्टी यांनी केले आहे.
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !