रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिल्यावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

अशा दैवी आश्रमावर सनातनद्वेष्टे मात्र दगडफेक आणि शिवीगाळ करतात !

सनातन आश्रम रामनाथी

१. श्री. अमित तात्याबा काटे, उधमनगर, रत्नागिरी.

अ. ‘आश्रम पाहून मला उच्च कोटीचे समाधान मिळाले.

आ. ‘ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ याच आश्रमात रोवली गेली आहे’, हे इथे प्रकर्षाने जाणवते.

इ. साधकांची निस्सीम सेवा आणि धर्मापोटी असणारा सेवेचा त्याग खरोखर भारावून सोडणारा आहे.

ई. ‘आमच्या हातूनसुद्धा अशीच धर्मसेवा व्हावी’, असे मला मनोमन वाटू लागले आहे.’

२. श्री. गणेश विजय गायकवाड, खेडशी, रत्नागिरी.

अ. ‘१६.१२.२०१८ या दिवशी मला रामनाथी आश्रमदर्शनाचे भाग्य लाभले. आजमितीस दिवसभरात आश्रमातील विविध गोष्टी जाणून घेतांना मला पुष्कळ आनंद झाला. आश्रमात आल्यानंतर मला ‘अध्यात्म आणि साधना यांचे तेज काय असते अन् ते कसे कार्यान्वित असते ?’, याची जाणीव प्रकर्षाने झाली.

आ. आयुष्यात आजपर्यंत भेट दिलेल्या धार्मिक स्थळांपेक्षा या आश्रमातील चैतन्य आणि शिस्त कित्येक पटींनी अधिक असल्याचे मला प्रथमच अनुभवता आले.

इ. आश्रम पाहून सनातन संस्थेच्या कार्याची व्याप्ती मला समजली. आश्रमात देव, देश आणि धर्म यांच्या कार्यासाठी सर्वस्व अर्पण करून पूर्णवेळ सेवा करणारे साधक प्रथमच पहाण्यास मिळाले.

ई. इथे येऊन परात्पर गुरुदेवजींच्या कार्याने मी भारावून गेलो.

उ. ‘मी आणि समस्त हिंदु बांधवांनी परात्पर गुरुमाऊलींचे कार्य देशभरात वाढवण्याची किती आवश्यकता आहे !’, हे मला समजले.

ऊ. येथे येऊन मी धन्य झालो. येथील चैतन्यातून मिळालेली ऊर्जा पुढील कार्यासाठी एका बलवर्धकाप्रमाणे (‘टॉनिक’प्रमाणे) काम करील, हे निश्‍चित !’

३. श्री. अभिजीत विकास गिरकर, साळवी स्टॉप, नाचणे, रत्नागिरी.

अ. ‘सनातन संस्थेच्या आश्रमात येण्याची माझी पुष्कळ इच्छा होती. येथे येऊन मला सात्त्विकतेचा खरा आनंद अनुभवता आला.

आ. येथे जे सांगितले आहे, त्याचा मी जीवनात उपयोग करीन.

इ. सनातन संस्थेचे कार्य लिहून आणि वाचून कळणार नाही. येथे येऊनच त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे अनिवार्य आहे.’ (१६.१२.२०१८)

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेला अभिप्राय

‘सूक्ष्म गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो; परंतु ‘त्या किती महत्त्वाच्या आहेत !’, हे प्रदर्शन पाहिल्यावर माझ्या लक्षात आले.’ – श्री. अमित तात्याबा काटे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, उधमनगर, रत्नागिरी. (१६.१२.२०१८)

  • सूक्ष्म: व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’.  साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहे.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध  करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक