स्वधर्माविषयी अत्यंत जागरूक असणारे अन्य पंथीय !

१. मडगाव येथे संपर्कासाठी एका दुकानात गेल्यावर दुकानाशेजारीच ‘रिक्शा थांबा’ असणे, साधिका दुकानदाराशी बोलतांना एक अन्य पंथीय रिक्शाचालक भ्रमणभाषवर बोलत असल्याचे दाखवून बोलणे ऐकण्यासाठी थांबल्याचे लक्षात येणे

‘आम्ही मडगाव येथे एका संपर्कासाठी एका दुकानात गेलो होतो. तेथे बाजूला अगदी लागूनच ‘रिक्शा थांबा’(स्टँड) आहे. पुढच्या रिक्शात भाडेकरू बसल्यावर पाठीमागची रिक्शा पुढे सरकत होती. आम्ही त्या दुकानदारांना विषय सांगताना आमच्या बोलण्यात ‘हिंदु’ हा शब्द पुष्कळ वेळा आला. ते ऐकून ‘एक अन्य पंथीय रिक्शाचालक भ्रमणभाषवर बोलत असल्याचे भासवून आमचे बोलणे ऐकत तेथेच थांबला होता’, हे लक्षात आले.

२. रिक्शाचालकाने भ्रमणभाषवर बोलत सहज दुकानाजवळ आल्याचे भासवणे, त्या वेळी आलेली सर्व भाडीही नाकारत त्याने साधिकांचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न करणे

आमचे बोलणे ऐकण्यासाठी त्याने मागच्या रिक्शाचालकांना पुढे जायला सांगितले. त्या वेळी ही गोष्ट माझ्या समवेत असलेल्या साधिकेच्या लक्षात आली; म्हणून आम्ही दुकानात आतल्या बाजूला जाऊन बोलू लागलो. तेव्हा तोही चालत भ्रमणभाषवर बोलत असल्याचे दाखवून दुकानाजवळ आला. तेव्हा त्या दुकानदाराच्याही ते लक्षात आले. त्याने त्या व्यक्तीला काहीतरी आणून देण्याचे निमित्त सांगून तिथून जायला सांगितले. तेव्हा तो तिथून गेला; पण आम्ही तिथून जाईपर्यंत तो तिथेच घुटमळत होता. या वेळी त्याने त्याच्या रिक्शासाठी आलेली सर्व भाडीही नाकारली.

यावरून ‘अन्य पंथीय त्यांच्या धर्माविषयी किती जागरूक असतात ! आणि पैशांपेक्षाही ते धर्मविषयक कृतींना प्रथम प्राधान्य देतात’, असे आमच्या लक्षात आले.’

– सौ. वेदिका पालन, फोंडा, गोवा. (२५.११.२०२०)