स्वभावदोष माझा ‘अपेक्षा करणे’ ।
म्हणजे आनंदावर विरजण टाकणे ॥
प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हावी, असे वाटणे ।
‘माझे सर्वांनी ऐकावे’, असे वाटणे ॥ १ ॥
दृष्टीत दिसतो करार अन् शब्दाला येते धार ।
मनात इतरांचा विचार नसतो फार ॥
‘स्वतः दुःखी होणे’ आणि ‘इतरांना दुःख देणे’ ।
अशी आहेत, या अहंच्या पैलूची लक्षणे ॥ २ ॥
मनाला कितीही दृष्टीकोन दिले ।
तरीही हा स्वभावदोष जात नसे ॥
बुद्धीने मनाला कितीही समजावले ।
तरी हा अडथळा पार करता येत नसे ॥ ३ ॥
त्यावर उपाय एक, तो म्हणजे स्वयंसूचना देणे (टीप) फार ।
प्रत्येक प्रसंगी ‘परेच्छेने वागणे’ हाच करा निर्धार ॥
वाढवा लवकर प्रेमभाव अन् करा दुसर्यांचा विचार ।
होईल सत्वरी गुरुकृपा अन् होई दूर हा विकार ॥ ४ ॥
टीप – स्वभावदोष निर्मूलनाच्या अंतर्गत मनावर योग्य विचार किंवा योग्य कृती करण्याचा संस्कार होण्यासाठी स्वतःच्या मनाला पुनःपुन्हा सूचना देणे, म्हणजे स्वयंसूचना !
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.२.२०२०)