शिवमोग्गा (कर्नाटक) – येथील उनासोंडी येथील दगड खाणीत जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेल्या ट्रकच्या झालेल्या स्फोटात ८ खाण कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनेच्या वेळी ट्रक एका जागी उभा होता आणि कामगार विश्रांती घेत होते.
जिस वजह से हुआ शिवमोगा में ब्लास्ट, उस डायनामाइट के अविष्कार पर पछताए थे एल्फ्रेड नोबेल#KarnatakaBlast https://t.co/IlMlUKTSH1
— Dainik Jagran (@JagranNews) January 22, 2021
त्या वेळी झालेला हा स्फोट इतका शक्तीशाली होता की, ३० किलोमीटरच्या परिसरातील अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि इमारतींची हानी झाली.
Pained by the loss of lives in Shivamogga. Condolences to the bereaved families. Praying that the injured recover soon. The State Government is providing all possible assistance to the affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 22, 2021
या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ‘घायाळांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी. स्फोटाची झळ बसलेल्या सर्वांना राज्य सरकार सर्व आवश्यक सहकार्य करत आहे’, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून म्हटले आहे.