‘वैद्यकीय क्षेत्रात अध्यात्मशास्त्र अंतर्भूत करणे’ या विषयावरील ‘वेबिनार’च्या सेवेत साधकांना सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

पू. रमानंद गौडा

‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटक राज्यातील डॉक्टरांसाठी ८ नोव्हेंबर २०२० या दिवशी ‘वैद्यकीय क्षेत्रात अध्यात्मशास्त्र अंतर्भूत करणे’ या विषयावर ‘वेबिनार’ (ऑनलाईन कार्यक्रम) पार पडला. या वेबिनारशी संबंधित सेवेच्या निमित्ताने आम्हाला सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांचे मार्गदर्शन लाभले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जसा साधकांच्या उन्नतीचा सतत ध्यास असतो, तसाच ध्यास त्यांच्या कृपेने संतपद गाठलेले पू. रमानंद गौडा यांनाही साधकांविषयी आहे. वेबिनारशी संबंधित सेवा करतांना भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने पू. रमानंद गौडा यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

डॉ. अंजेश कणगलेकर

१. ‘गुरुकार्यासाठी समर्पण कसे करायचे ?’ याविषयी आधुनिक वैद्यांना शिकवणारे पू. रमानंद गौडा !

‘वेबिनार’शी संबंधित सेवांचा प्रारंभ पू. रमानंद गौडा यांच्या सत्संगाने झाला. या आपत्काळात (साधनेच्या संधीकाळात) समाजातील सात्त्विक व्यक्तींना साधनेकडे वळवण्याची संधी मिळावी, यासाठी कर्नाटक राज्यातील सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या सर्व आधुनिक वैद्यांना
पू. रमानंद गौडा यांचा सत्संग लाभला. या वेळी पू. रमानंददादांनी ‘आधुनिक वैद्यांनी स्वतःच्या कौशल्याचे आणि स्वतःच्या सामाजिक प्रतिष्ठेचे गुरुकार्यासाठी समर्पण कसे करायचे ?’, याविषयी आम्हाला मार्गदर्शन केले.

२. पू. रमानंद गौडा यांनी अल्प दिवसांत परिणामकारक कृती करण्याची तळमळ साधकांच्या मनात तेवत ठेवणे

पू. रमानंददादांच्या वाणीत चैतन्य एवढे होते की, त्यांच्या मार्गदर्शनाला आधुनिक वैद्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक आधुनिक वैद्याने त्याच्या संपर्कातील आधुनिक वैद्य, साधनेत रूची असणारू, तसेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याची ओळख असणारे हितचिंतक, वाचक, जिज्ञासू अन् धर्मप्रेमी यांना साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या साहाय्याने संपर्क करण्याचे नियोजन केले. अत्यंत अल्प कालावधीत परिणामकारक सेवा करण्याची तळमळ पू. रमानंददादांनी साधक आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये निर्माण केली.

३. पू. रमानंद गौडा यांच्या सत्संगानंतर सेवांची विभागणी करून सेवा केल्यावर साधकांना पुष्कळ सकारात्मक प्रतिसाद मिळणे

सेवा व्यवस्थित व्हावी, यासाठी पू. रमानंद गौडा यांच्या सत्संगानंतर सेवांची विभागणी केली आणि त्यानुसार आढावा घेण्यात येत होता. समाजातील आधुनिक वैद्यांना संपर्क करणे आणि त्यांच्यासाठी ‘ऑनलाईन कार्यक्रम’ (वेबिनार) घेणे, हा उपक्रम कर्नाटक राज्यात पहिल्यांदाच होत होता. त्यामुळे प्रतिसाद कसा मिळेल, याचा काहीच अंदाज नव्हता; पण जसजसे संपर्क होत गेले, तसतसे सर्वच साधक आणि कार्यकर्ते यांना संपर्काच्या वेळी पुष्कळ सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे साधक आणि कार्यकर्ते यांचा उत्साह अजून वाढला.

४. ‘वेबिनार’ची सेवा नवीन होती. त्यामुळे याआधी अशा प्रकारची सेवा केलेल्या अन्य राज्यांतील साधकांचे साहाय्य घेतले. या साधकांनी विषयाची मांडणी करण्याविषयी आणि कार्यक्रमाच्या प्रसारणासाठी लागणारे तांत्रिक साहाय्य केले.

५. ‘वेबिनार’च्या सेवेत सर्वच साधकांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेऊन संघटितपणे प्रयत्न करणे

‘वेबिनार’च्या सेवेत असणारे साधक आणि आधुनिक वैद्य यांनी पुष्कळ तळमळीने अन् पुढाकार घेऊन संघटितपणे प्रयत्न केले. काही आधुनिक वैद्यांनी स्वतःहून अनेकांना संपर्क करून निमंत्रण दिले.

६. ‘पालकत्व म्हणजे काय ?’, हे प्रत्यक्ष कृतीतून शिकवणारे पू. रमानंद गौडा ! 

​‘वेबिनार’च्या सेवा चालू असतांना पू. रमानंद गौडा यांचे प्रत्येक साधकाकडे सतत लक्ष असायचे. ‘साधकांना काही अडचण नाही ना ? त्यांच्या सेवा वेळेत पूर्ण होतात ना ? सेवा करतांना आध्यात्मिक स्तरावरच्या समस्या येत नाहीत ना ?’ याकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. या वेबिनारमध्ये विषय मांडणारे साधक आणि अन्य साधक यांना आध्यात्मिक स्तरावरच्या समस्या येऊ नयेत; म्हणून पू. रमानंददादांनी नामजपाचे मंडल घालणे आणि अन्य नामजपादी उपाय करण्यास सांगितले, तसेच स्वतःही सर्वांसाठी नामजप केला. यातून त्यांचा साधकांप्रती असलेला प्रेमभाव, साधकांची पितृतुल्य काळजी घेणे आदी गुण दिसून आले.

– डॉ. अंजेश कणगलेकर, बेळगाव, कर्नाटक. (१२.११.२०२०)