देशात कोरोना लस घेणार्‍या तिसर्‍या आरोग्य कर्मचार्‍याचा मृत्यू

भाग्यनगर (तेलंगाणा) – राज्यातील एका ४२ वर्षीय आरोग्य कर्मचार्‍याचे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दुसर्‍या दिवशी छातीत दुखू लागल्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ‘या कर्मचार्‍याच्या मृत्यूचा आणि कोरोना लसीचा कोणताही संबंध नाही’, असा दावा राज्य सरकारने केला आहे. या कर्मचार्‍याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अद्याप अहवाल मिळालेला नाही. आतापर्यंत कोरोना लस घेणार्‍या ३ आरोग्य कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मुरादाबाद येथील सरकारी रुग्णालयातातील वॉर्डबॉय महिपाल सिंह यांचा आणि कर्नाटकमधील बेल्लारी येथील आरोग्य विभागात काम करणार्‍या ४३ वर्षीय कर्मचार्‍याचा मृत्यू झाला होता.