अनेक वर्षांपासून कुळाचार म्हणून प्रत्येक कार्यक्रमात श्री सरस्वती देवीची प्रतिमा वापरून स्तवन करतो ! – मनोहर म्हैसाळकर, अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ

साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी ‘जीवनव्रती पुरस्कार’ नाकारल्याचे प्रकरण

डॉ. यशवंत मनोहर यांच्याप्रमाणे साहित्य संघाची सुद्धा काही तत्त्वे आहेत !  

डॉ. यशवंत मनोहर व श्री सरस्वती देवीची प्रतिमा

नागपूर – विदर्भ साहित्य संघाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘जीवनव्रती पुरस्कार’ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी श्री सरस्वती देवीची प्रतिमा ठेवली म्हणून नाकारला होता. विदर्भ साहित्य संघ ही वाङ्मयीन संस्था आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी श्री सरस्वती देवीची प्रतिमा नको, श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेमुळे धार्मिक स्वरूप येत असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला होता. याविषयी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी त्यांच्या आक्षेपाला सडेतोड उत्तर देतांना म्हणाले, ‘‘श्री सरस्वती देवीची प्रतिमा ही कुठल्या धर्माचे प्रतीक नाही, तर ती विद्येची देवता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कुळाचार म्हणून प्रत्येक कार्यक्रमात तिची प्रतिमा वापरतो, स्तवन करतो. त्यामुळे जशी डॉ. यशवंत मनोहर यांची तत्त्वे आहेत, तशी साहित्य संघाची सुद्धा काही तत्त्वे आहेत. डॉ. यशवंत मनोहर यांनी लिखित स्वरूपात सांगितले होते की, पुरस्कार घोषित झाल्यामुळे त्यांना आनंद झाला आहे; पण कार्यक्रम आटोपल्यानंतर मनोहर यांनी त्यांचा आक्षेप कळवला आहे.’’