जाण ठेवोनी पानिपताची आण त्या हिंदु राष्ट्राची ।
पुनरावृत्ती हिंदवी स्वराज्याची जखम भरू पानिपताची ॥
पानिपताने धडा शिकवला हिंदूंच्या असंघतेचा ।
सहस्रो सैनिकांचे बळी चढले हिंदू हिंदू एकटे लढले ॥
परराज्याच्या राजांना न कळे हे समर राष्ट्ररक्षणाच
प्रांतभेदाची दृष्ट लागली साथ सोडली स्वकियांनी ॥
डाग आमुच्या इतिहासाचा पुसून टाकूया आता ।
शौर्याची शर्थ करूया केशरी ध्वजा फडकवूया ॥
संक्रांतीचा संकल्प करूया प्रांतभेद, जातीभेद दूर लोटूया ।
हिंदू सारे एकची आता चला हिंदु राष्ट्र स्थापूया ॥
इतिहास निर्माण करूया पराक्रमाच्या हृदयाने ।
रोवूया पाया हिंदु राष्ट्राचा भगवंताच्या अधिष्ठानाने ॥
– श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती