१. ऐकण्याची वृत्ती
‘कु. गायत्री ही केरळ येथील एका साधकाची बहीण आहे. ती आश्रमापासून दूर कण्णूर जिल्ह्यात रहाते. ती तिच्या भावाने सांगितल्याप्रमाणे नामजप, खोक्यांचे उपाय, आवरण काढणे इत्यादी साधनेचे प्रयत्न करते.
२. साधकांप्रती जवळीक वाटणे
ती केरळ सेवाकेंद्रात २ वेळा आली होती. तेव्हा तिचा साधकांशी जास्त संपर्क नव्हता, तरी तिला सर्व साधकांशी जवळीक वाटते.
३. ती वाचकांसाठीचा भाववृद्धी सत्संग नियमित ऐकते.
४. साधनेची तळमळ
आता ‘लॉकडाऊन’ चालू आहे. त्यामुळे तिला नियमित ‘ऑनलाईन’ सत्संग (स्थानिक भाषेतील भाववृद्धी सत्संग, स्वभावदोष-निर्मूलन सत्संग) मिळतो. त्या प्रत्येक सत्संगात ती उत्स्फूर्तपणे सहभागी होते आणि सांगितलेली प्रत्येक कृती आचरणात आणते. तिला काही शंका असल्यास ती लगेच विचारते. त्यामुळे तिला पुष्कळ अनुभूती येत आहेत, तसेच तिची तळमळ वाढली आहे.
५. तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहिले नाही, तरी तिचा त्यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे.’
– कु. प्रणिता सुखठणकर, केरळ (४.५.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |