‘गुरु सर्व प्रकारे साधकाचा भार उचलतात’, याची साधकाला आलेली प्रचीती !

श्री. प्रेमप्रकाश सिंह

‘२२.१२.२०१९ या दिवशी मी ओडिशा राज्यातील ‘राऊरकेला ते भुवनेश्‍वर’ असा प्रवास रेल्वेने करत होतो. मी माझी ‘बॅग’ माझ्या आसनाच्या खाली ठेवली. रात्री मी झोपण्यासाठी वरच्या आसनावर गेलो. काही वेळानंतर मला आवाज ऐकू आला, ‘‘आपल्यापैकी कुणाची ही बॅग आहे का ? ही बॅग चोर घेऊन गेला होता.’’ मी झोपलेल्या स्थितीतच ‘कुणाची बॅग आहे ?’, या विचाराने खाली वाकून पाहिले. तेव्हा ती बॅग माझीच होती. मी खाली उतरून तिकीट तपासनिसाकडून याविषयी जाणून घेतले.

त्यानंतर मला कळले, ‘चोर माझी पिशवी घेऊन डब्यातून उतरला. त्या वेळी तिकीट तपासनिसाला त्याचा संशय आला. त्यामुळे त्याने चोराजवळ जाऊन ‘बॅगे’विषयी चौकशी केली. त्या चोराने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तेव्हा तिकीट तपासनिसाने त्याला पकडून आमच्या डब्यामध्ये आणले आणि तो आवाज देत होता, ‘‘ही बॅग कुणाची आहे ?’’ मी त्यांना ती ‘बॅग’ माझी असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी ती ‘बॅग’ मला देऊन रेल्वे सुरक्षा दलातील सैनिकांना (जवानांना) बोलावून माझ्याकडून ‘बॅगे’संदर्भातील चौकशी करून औपचारिक पूर्तता केली. त्या चोराला ‘सी.आर्.पी.एफ्.’ (सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स)कडे सोपवून तिकीट तपासनीस निघून गेला.

‘गुरुदेव कशा प्रकारे शिष्याच्या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवतात !’, या विचाराने माझी गुरुदेवांप्रती पुनःपुन्हा कृतज्ञता व्यक्त होत होती. ते त्यांच्या शिष्याचा सर्व प्रकारे भार उचलतात. आजही मला या प्रसंगाची आठवण झाल्यास माझे मन कृतज्ञतेने भरून येते.

– श्री. प्रेमप्रकाश सिंह, ओडिशा (२२.१२.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक