सातारा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा !

सातारा, १८ डिसेंबर (वार्ता.) – वाई तालुक्यातील विरमाडे येथील बंद असलेली ११ घरे १५ डिसेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली आहेत. १२ वे घर फोडतांना शेजारील व्यक्तीला जाग आली. त्या वेळी त्याने आरडा-ओरडा केल्यावर चोरांनी त्याला वीट फेकून मारली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आणि पलायन केले. गावातील काही युवकांनी चोरट्यांचा पाठलाग केला; मात्र त्यांच्याकडे धारदार शस्त्रे असल्याने युवक चोरट्यांना पकडू शकले नाहीत. ग्रामस्थांनी तात्काळ भुईंज पोलिसांना पाचारण केले. पोलीस पुढचा तपास करत असून गावात भीतीचे वातावरण आहे.
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक