परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी एका साधिकेला आलेली अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी प्रार्थना करत असतांना त्यांचे विश्‍वरूपात दर्शन होणे आणि नंतर महर्षींनी तसेच सांगितल्याचे कळल्याने आनंद होणे

साधकांना अनुभूतींच्या माध्यमातून आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘११.५.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या आरंभी श्री. निषाद देशमुख साधकांना प्रार्थना करायला सांगत असतांना मला परात्पर गुरुदेवांचे विश्‍वरूपात दर्शन झाले. ते पुष्कळ मोठे दिसत होते. त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला मला त्यांची अनेक रूपे दिसत होती. मध्यभागी विराट रूपात केवळ परात्पर गुरुदेव स्पष्ट दिसत होते. त्यानंतर प्रत्यक्ष सोहळ्यात परात्पर गुरुदेवांचे श्री सत्यनारायण रूपात दर्शन झाले. त्या वेळी श्री. विनायक शानभाग यांनी सांगितले, ‘परात्पर गुरुदेवांच्या या रूपातील दर्शनाने साधकांना विश्‍वरूपाच्या दर्शनाचा लाभ होणार आहे’, असे महर्षींनी सांगितले आहे.’ हे ऐकून मला अतिशय आनंद झाला; कारण त्याआधीच मला परात्पर गुरुदेवांनी विश्‍वरूपातील दर्शन घडवले होते. ‘हे गुरुदेवा, मला याच जन्मी आपल्या पावन चरणी एकरूप करून घ्या’, हीच आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

– कु. कुसुमावती, मंगळुरू (११.५.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक