‘आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा ही भारताची बलस्थाने असल्याने त्यांच्या मुळावरच घाव घातल्यास त्याला दास बनवू शकू’, असा कावेबाज हेतू ठेवून भारतीय शिक्षणपद्धत आणि संस्कृती नष्ट करण्याचे कुटील कारस्थान रचणारा मेकॉले !

‘मेकॉलेने २.२.१८३५ या दिवशी ब्रिटीश संसदेत भारताला गुलाम बनवण्यासाठी पुढील घृणास्पद आणि कुटील सल्ला दिला होता. ‘मी भारताच्या कानाकोपर्‍यात फिरलो; पण मला अशी एकही व्यक्ती मिळाली नाही की, जी भिकारी, चोर असेल. अशी अपार संपदा, इतका उच्च नैतिक आदर्श आणि इतक्या प्रतिभावान व्यक्ती असलेल्या देशाला आपण कधीही जिंकू शकणार नाही. जर भारताला दास (गुलाम) बनवायचे असेल, तर या देशाचा मेरुदंड, अर्थात भारतीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा तोडाव्या लागतील; म्हणून माझे मत असे आहे की, आपल्याला यांची शिक्षणपद्धत आणि संस्कृती नष्टभ्रष्ट करावी लागेल. ज्या वेळी प्रत्येक भारतियाच्या मनात ही गोष्ट पक्की ठसेल की, जे काही ‘विलायती’ आहे, ते त्याच्या ‘देशी’हून श्रेष्ठ आणि महान आहे, तेव्हाच ते हीन भावनेने ग्रस्त होऊन आपला गौरव, संस्कार, स्वदेश प्रेम आणि स्वाभिमान गमावून बसतील. तेव्हा हे तसेच बनतील, जसे आपल्याला पाहिजे आहे, म्हणजे पूर्णतः गुलाम !’