आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला खेद !

मुंबई, १० जुलै (वार्ता.) – वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणापत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या घोषणेचा समावेश झाला; परंतु पावसाळी अधिवेशनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा ठराव करण्यात आला नाही, याविषयी भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत खेद व्यक्त केला. ते म्हटले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे सरकारच त्यांना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव आणत नसेल, तर मी शपथ घेऊन सांगतो की, ही मागणी मी पुन्हा सभागृहात उपस्थित करणार नाही.’
ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यकाळात इंग्रजांनी सावरकरांना यातना दिल्या. सावरकरांच्या विचारांचे सरकार सत्तेत असतांना त्यांनी सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव न करणे हे वेदनादायी आहे.’’
हिवाळी अधिवेशनामध्ये ठराव आणण्यात येईल ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा
कोणत्याही अधिवेशनात ठराव आणावयाचा झाल्यास त्याची पूर्वसूचना कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत दिली जाते. त्याविषयी सर्व पक्षांच्या गटप्रमुखांना सांगितले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या ठरावाविषयी कामकाज सल्लागार समितीमध्ये चर्चा झाली नव्हती. त्यामुळे ठराव घेणे योग्य होणार नाही. पुढील अधिवेशनामध्ये कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये हा ठराव घेण्यासाठी मी पाठपुरावा करीन आणि हिवाळी अधिवेशनामध्ये हा ठराव केला जाईल.

भूस्खलनामुळे सांबरवाडी (सातारा) येथे मुख्य जलवाहिनीला तडे !
राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा न करता विरोधकांकडून शिव्याशाप आणि खोटे आरोप ! – एकनाथ शिंदे
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव !
मोशी (पुणे) येथील कचरा डेपो दुर्घटनेतील बचावकार्य चालूच !
अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी गृहविभागासह २० शासकीय विभाग एकत्रित काम करणार ! – मुख्यमंत्री
कोयना धरणात ५० टी.एम्.सी. पाणीसाठा !