
मंगळुरू (कर्नाटक) – सामाजिक माध्यमाद्वारे ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी गुरुपूरजवळील अड्डूरू केळगीनकेरे येथील रहिवासी अफरीद उपाख्य अप्पी (वय २० वर्षे) याला अतिरिक्त जिल्हा आणि पॉक्सो न्यायालयाने २० वर्षांचा कठोर कारावास आणि ५५ सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. आरोपी दंड भरण्यास असमर्थ ठरल्यास त्याला ४ महिन्यांची साधा कारावास भोगावा लागणार आहे. दंडाची ५५ सहस्र रुपयांची रक्कम पीडितेला हानीभरपाई म्हणून दिली जावी, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ५ लाख ४५ सहस्र रुपये हानीभरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले आहेत.
बंट्वाळ तालुक्यातील भाड्याच्या घरात रहाणार्या १७ वर्षीय मुलीची वाहनचालक अफरीद याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर तो तिच्याशी बोलून तिला प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवू लागला. २७ मे २०२४ या दिवशी मुलगी घरात एकटी असतांना त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच या कृत्याचा व्हिडिओ बनवला असल्याचे सांगून शारीरिक संबंधांना नकार दिल्यास व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने अनेकदा अत्याचार केले आणि लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली. यामुळे मानसिक धक्का बसलेल्या पीडित मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
झाड कोसळण्यास त्याच्या भोवतीचे काँक्रिटीकरणच कारणीभूत !
Belur Chennakeshava Temple Theft : कर्नाटकातील ऐतिहासिक चन्नकेशव स्वामी मंदिराच्या दानपेटीतील १ लाख ९८ सहस्र रुपये चोरणार्याला अटक
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासात काम करणार्या २३ कर्मचार्यांचे त्यागपत्र
Railway Viral Video : समोसा खाण्यासाठी रेल्वे चालकाने रेल्वेगाडी थांबवल्याचा व्हिडिओ दिशाभूल करणारा ! – रेल्वे विभाग
‘एआय’ आधारित पाळत ठेवणार्या यंत्रणेमुळे अनंतनागमध्ये ३ संशयित आतंकवाद्यांना अटक
Bengal Gang Rape : बंगालमध्ये आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार आणि हत्या: २ वासनांध मुसलमानांना अटक