व्हिडिओत दाखवलेली प्रवासी रेल्वेगाडी प्रत्यक्षात मालगाडी असल्याचा रेल्वेचा खुलासा !
इंदूर (मध्यप्रदेश) – समोसा खरेदी करण्यासाठी रेल्वेच्या चालकाने रेल्वेगाडी थांबवल्याचा व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे, असा खुलासा पश्चिम रेल्वे विभागाने केला. संबंधित व्हिडिओ इंदूर-महू डेमू पॅसेंजरचा नसून मालगाडीचा असल्याचे स्पष्ट करत तो चुकीच्या माहितीसह प्रसारित करण्यात आल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.
रेल्वे विभागाच्या माहितीनुसार संबंधित मालगाडी राऊ होम सिग्नलजवळ नियोजित अभियांत्रिकी कामासाठी अधिकृतपणे थांबवण्यात आली होती. या थांब्यादरम्यान साहाय्यक चालकाने जवळून समोसे आणि कचोरी खरेदी केली; मात्र या घटनेचा विपर्यास करून प्रवासी रेल्वे वैयक्तिक कारणासाठी थांबवण्यात आल्याची अफवा पसरवण्यात आली. अधिकृत थांब्याव्यतिरिक्त कोणताही अनधिकृत थांबा घेण्यात आला नसल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे. रेल्वेने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी चालू ठेवली असून अधिकृत थांब्यादरम्यान सुरक्षा किंवा सेवा नियमांचे कोणतेही उल्लंघन झाले का ?, याची पडताळणी केली जाणार आहे.

Belur Chennakeshava Temple Theft : कर्नाटकातील ऐतिहासिक चन्नकेशव स्वामी मंदिराच्या दानपेटीतील १ लाख ९८ सहस्र रुपये चोरणार्याला अटक
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासात काम करणार्या २३ कर्मचार्यांचे त्यागपत्र
‘एआय’ आधारित पाळत ठेवणार्या यंत्रणेमुळे अनंतनागमध्ये ३ संशयित आतंकवाद्यांना अटक
Bengal Gang Rape : बंगालमध्ये आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार आणि हत्या: २ वासनांध मुसलमानांना अटक
Baglamukhi Temple Fund Theft : मध्यप्रदेशातील माँ बगलामुखी शक्तिपीठात दानाची चोरी : ३ वर्षे बनावट समिती गोळा करत होती देणगी !
UP Temple Bell Theft : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील बुद्धेश्वर मंदिराचा सेवादारच निघाला घंटाचोर !