जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली चालतो मंदिराचा कारभार

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली असलेल्या प्रसिद्ध आणि प्राचीन बुद्धेश्वर मंदिरातून वारंवार होत असलेल्या घंटाचोरीचे गूढ अंततः उलगडले असून मंदिरातीलच एका सेवादाराला पितळेची मौल्यवान घंटा चोरतांना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गोलू उपाख्य गौरव असे या सेवादाराचे नाव असून त्याच्याकडे मंदिरात प्रतिदिन होणार्या शृंगार आरतीच्या व्यवस्थेचे दायित्व आहे. याचाच अपलाभ उठवत त्याने हे कृत्य केले. याविषयी स्थानिक नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मंदिरातून यापूर्वीही पितळेच्या अनेक घंटा चोरीला गेल्या होत्या; मात्र या घटनांचा कोणताही सुगावा लागत नव्हता. गौरवच्या अटकेनंतर या सर्व चोरींमागेही त्याचाच हात असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लेखपाल आनंद श्रीवास्तव यांनी पारा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार पकेली. बुद्धेश्वर मंदिरातील या घटनेची नोंद घेत पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि भाविक यांनी प्रशासनाकडे केली आहे.
Belur Chennakeshava Temple Theft : कर्नाटकातील ऐतिहासिक चन्नकेशव स्वामी मंदिराच्या दानपेटीतील १ लाख ९८ सहस्र रुपये चोरणार्याला अटक
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासात काम करणार्या २३ कर्मचार्यांचे त्यागपत्र
Railway Viral Video : समोसा खाण्यासाठी रेल्वे चालकाने रेल्वेगाडी थांबवल्याचा व्हिडिओ दिशाभूल करणारा ! – रेल्वे विभाग
‘एआय’ आधारित पाळत ठेवणार्या यंत्रणेमुळे अनंतनागमध्ये ३ संशयित आतंकवाद्यांना अटक
Bengal Gang Rape : बंगालमध्ये आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार आणि हत्या: २ वासनांध मुसलमानांना अटक
Baglamukhi Temple Fund Theft : मध्यप्रदेशातील माँ बगलामुखी शक्तिपीठात दानाची चोरी : ३ वर्षे बनावट समिती गोळा करत होती देणगी !