मोशी (पुणे) येथील ‘कचरा डेपो’ परिसरात इमारत भूस्खलनामुळे कोसळली !

  • ३ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता     

  • १० ते १२ कर्मचारी ढिगार्‍याखाली

पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी ‘पी.पी.पी.’ (सार्वजनिक-भागीदारी तत्त्वावर) तत्त्वावर विकसित केल्या जाणार्‍या ‘वेस्ट-टू-एनर्जी’ (टाकाऊतून ऊर्जा निर्मिती) या प्रकल्पाच्या ठिकाणी दुर्घटना घडली. येथे एका निर्माणधीन इमारतीचा भागातील कचरा डेपोच्या ठिकाणी भूस्खलन झाल्याने कचरा इमारतीवर पडून इमारत कोसळली. या दुर्घटनेत ३ कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या इमारतीत अजूनही १० ते १२ कर्मचारी ढिगार्‍याखाली अडकले असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्नीशमनदल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यांची पथके तात्काळ घटनास्थळी आली. ढिगार्‍याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे कार्य चालू आहे. ढिगारा पूर्णपणे हटवल्यानंतरच मृतांची किंवा घायाळांची संख्या समजू शकेल. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. इमारत मुसळधार पावसामुळे कोसळली कि इतर कोणते कारण होते ? माहितीनुसार इमारतींचे बांधकाम चालू असून अचानक उभारलेला सांगाडा कोसळला. या इमारतींविषयी महापालिका प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.