
देहू-आळंदी (जिल्हा पुणे), ५ जुलै (वार्ता.) – वारकर्यांचे डोळे ज्या दिंडी सोहळ्याकडे लागतात, अखेर तो दिवस अगदी एक दिवसावर आला असून ‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजरात पंढरपूर, देहू-आळंदीत भगव्या पतका घेऊन वारकरी येण्यास प्रारंभ झाला आहे. देहू-आळंदी आणि पंढरपूर पांडुरंगाच्या भक्तीत बुडून गेले असून सर्वच चैतन्य आणि श्री विठ्ठलाच्या भेटीची अपूर्व ओढ पहायला मिळत आहे. देहू-आळंदीत पाऊस असला, तरी दिंड्यांची लगबग चालू आहे. पुणे शहरही या आठवड्यात दिंडीमय झालेले आढळून येणार आहे.

पंढरपूर – केरळ आणि तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आणि त्यांच्या पत्नी अनघा आर्लेकर यांनी ५ जुलैला श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले.
पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास ५ वर्षांची बंदी
वारीच्या तोंडावर आळंदी येथील इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे दूषित !
आळंदी ते पंढरपूर अशी २२५ किलोमीटरची ‘धाव वारी’ यशस्वी !
आषाढी वारीसाठी आळंदी नगरी सज्ज !
वारकर्यांच्या साहाय्यासाठी ‘धर्मवीर आध्यात्मिक सेने’च्या वतीने ‘वारी हेल्पलाईन’ !
आषाढी वारीमध्ये प्रथमच हवाई रुग्णवाहिकेची (एअर ॲम्ब्युलन्स) सुविधा