‘सिव्हिल सोसायटी नेटवर्क फॉर ह्युमन ट्रॅफिकिंग व्हिक्टिम असिस्टन्स’ या संस्थेची माहिती
नोकरीचे आमीष दाखवून केली फसवणूक

नवी देहली – थायलंड-म्यानमार सीमेवरील कुप्रसिद्ध ‘गोल्डन ट्रँगल’ भागातील सायबर ठगांच्या अड्ड्यांवर विविध देशांतील अनुमाने ५ सहस्र ३०० नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले असून त्यात अनुमाने ८०० भारतीय नागरिकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील किमान २५ तरुणांचाही यामध्ये समावेश आहे. बँकॉकमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमीष दाखवून त्यांना तेथे नेण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.
‘सिव्हिल सोसायटी नेटवर्क फॉर ह्युमन ट्रॅफिकिंग व्हिक्टिम असिस्टन्स’ या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ५ सहस्र ३०० ओलिसांमध्ये चीनचे १ सहस्र ६०० नागरिक, म्यानमारचे २००, थायलंडचे २० नागरिक, तसेच फिलिपाइन्स, तैवान, मलेशिया, ब्राझिल, रशिया, केनिया, युगांडा, रवांडा आणि झिम्बाब्वे या देशांतीला नागरिकांचाही समावेश आहे.
ओलिसांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचे प्रयत्न चालू
या तरुणांच्या सुटकेसाठी केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांनी प्रयत्न चालू केले आहेत. परराष्ट्र मंत्रालय आणि बँकॉकमधील भारतीय दूतावास यांच्याशी समन्वय साधला जात असून महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन, खासदार अशोक चव्हाण आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही या प्रकरणात पुढाकार घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार म्यानमारमधील अशा केंद्रांमध्ये १ लाखांहून अधिक लोकांना सक्तीने काम करण्यास भाग पाडले जात आहे. भारताने गेल्या दीड-दोन वर्षांत अशा केंद्रांतून २ सहस्र ४०० हून अधिक भारतियांची सुटका केली आहे.
‘गोल्डन ट्रँगल’ म्हणजे काय ?थायलंड, म्यानमार आणि लाओस या ३ देशांच्या सीमा ज्या ठिकाणी एकत्र येतात, त्या प्रदेशाला ‘गोल्डन ट्रँगल’ म्हटले जाते. हा भाग पूर्वी अफू आणि इतर अमली पदार्थ यांचे उत्पादन अन् तस्करी यांसाठी जगभरात कुप्रसिद्ध होता. अलीकडच्या काळात येथे मानवी तस्करी, ऑनलाइन आर्थिक फसवणूक (सायबर स्कॅम), अवैध कॉल सेंटर आणि सशस्त्र गुन्हेगारी टोळ्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नोकरीचे आमीष दाखवून परदेशी तरुणांना येथे आणले जाते आणि त्यांना सायबर फसवणुकीसाठी सक्तीने काम करण्यास भाग पाडले जाते. यास विरोध करणार्यांना मारहाण, विजेचे धक्के आणि बंदुकीचा धाक दाखवला जात असल्याचे समोर आले आहे. |
केंद्रशासनाकडून म्हादई जलतंटा लवादाला आणखी १ वर्षाची मुदतवाढ
गोव्यात वीजवितरणाचे काम टाटा पॉवर आस्थापनाला दिलेले नाही ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री
भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये सामंजस्य करार
Zeenat Ibrahim Arrested : भूमी खरेदीच्या व्यवहारात फसवणूक करणार्या मुसलमान महिलेला अटक
हलगर्जीपणाच्या प्रकरणी नाशिक विभागातील ११ अधिकारी निलंबित !
Mobile Torch For Bus : भ्रमणभाषच्या टॉर्चच्या प्रकाशात ९० कि.मी. बस चालवली !