
कळंबोली – कळंबोली परिसरातील रस्ते आणि नाले यांच्या कामासाठी हटवलेली एन्.एम्.एम्.टी. (नवी मुंबई महापालिका परिवहन सेवा) बसथांब्याचे छत आणि दिशादर्शक फलक कामाच्या पूर्ततेनंतर पुनर्स्थापित केलेले नाहीत. प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थी यांना निवार्याअभावी रस्त्यावर किंवा पदपथावर उभे रहावे लागते. प्रशासनाने सांगितले, ‘हे बसथांबे पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले असल्याने छत उभारण्याचे दायित्व महापालिकेचे आहे.’ बसथांब्यांच्या ठिकाणी बेकायदेशीररित्या वाहने उभी केली जात असल्याने प्रशासनाच्या बसगाड्या थांब्यापर्यंत पोचू शकत नाहीत. परिणामी बसगाड्या मध्यभागीच थांबवाव्या लागतात. यामुळे प्रवाशांना रस्त्यावर भरधाव वाहतुकीतच बसमध्ये चढ-उतार करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ‘महानगरपालिकेने तातडीने बसथांब्याचे छत उभारावे आणि बेकायदेशीररित्या वाहनांवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !