
मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – आगामी नाशिक कुंभपर्वासाठी काढलेल्या सहस्रो कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत २४१ कोटी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. या प्रकरणाची विशेष अन्वेषण पथकाद्वारे चौकशी करून फौजदारी गुन्हे नोंद करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी ३ जुलै या दिवशी विधान परिषदेत केली. ते म्हणाले की, नाशिक सिंहस्थ कुंभपर्वासाठी रस्ते विकासाची २ सहस्र २७० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली; मात्र ती मिळवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत अवटी आणि ‘हर कन्स्ट्रक्शन’चे विलास बिरारी यांनी मिळून १६ आस्थापनांची साखळी सिद्ध केली. शासकीय नियमांचे उल्लंघन करून मर्जीतील कंत्राटदारांना कामे देण्यासाठी इतर कंत्राटदारांना जाणीवपूर्वक अपात्र ठरवण्यात आले.
‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा शुभारंभ !
राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !
निदा खान हिला जामीन संमत !
बदलापूर येथे गोमांस विक्री करण्याच्या सिद्धतेत असलेल्या ३ धर्मांधांना अटक
पावसामुळे राज्यातील दळणवळणावर परिणाम
८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर ३५ वर्षांच्या सलमानने केला बलात्कार !