
मडगाव, ३ जून (वार्ता.) – पर्तगाळ, काणकोण येथील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठ येथे मठाला भेट देणार्या सर्व भाविकांसाठी वस्त्रसंहिता कठोरतेने लागू करण्यात आली आहे. मठाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी मठाच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी वस्त्रसंहिता केवळ मठाच्या अनुयायांना लागू होती आणि आता ती मठाला भेट देणार्या प्रत्येक भाविकाला लागू करण्यात आली आहे.
आता नवीन नियमानुसार मठाला भेट देणार्या पुरुषाने पांढर्या रंगाचा शर्ट आणि लुंगी किंवा सदरा-पायजमा आणि महिलांनी साडी, सलवार-कुर्ता आदी भारतीय वेशभूषा करणे अनिवार्य आहे. जीन्स, ‘हाफ पँट’, टी-शर्ट आदी पाश्चात्त्य वेशभूषा, तसेच रंगीत लुंगी नेसणे नियमबाह्य ठरवले जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार मठाशी निगडित बहुतेक देवस्थानांनी आपापल्या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता यापूर्वीच लागू केली आहे. गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठ हा गौड सारस्वत ब्राह्मण समाजाशी निगडित असून याचे अनुयायी गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांत आहेत.
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !