सहस्रो हिंदूंना हिंदु धर्मात पुनर्प्रवेश देण्यासाठी कष्ट घेतल्याने सन्मान

नवी देहली – येथील ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया’ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका समारंभात प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांना ‘हिंदु केसरी सेवा, सुरक्षा आणि समरसता (सलोखा) पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘माय होम इंडिया’ या संस्थेच्या वतीने समाजसेवा, सनातन संस्कृतीचे जतन आणि सामाजिक सलोखा या क्षेत्रांतील श्री. जुदेव यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
🕉️ Inspiring Commitment to Dharma & Society!
On the birth anniversary of Veer Savarkar, @prabaljudevBJP was honoured with the prestigious ‘Hindu Kesari’ award for his efforts in facilitating the return of thousands of Hindus to Hindu Dharma.
Accepting the honour, he reaffirmed… pic.twitter.com/UGsFuGa8lJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 5, 2026
श्री. जुदेव हे त्यांचे दिवंगत वडील कुमार दिलीप सिंह जुदेव यांनी चालू केलेली ऐतिहासिक ‘घरवापसी मोहीम’ (धर्मांतरितांना हिंदु धर्मात पुनर्प्रवेश देण्याची मोहीम) अविरतपणे पुढे नेत आहेत. आजवर या मोहिमेद्वारे वैदिक मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधी यांच्या माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या सहस्रो हिंदु बांधवांची घरवापसी यशस्वीरित्या केली आहे.
माझ्या वडिलांच्या आदर्शांवर चालण्याचा प्रयत्न ! – जुदेव यांचे मनोगत
या प्रसंगी बोलतांना श्री. जुदेव म्हणाले की, हा सन्मान स्वीकारणे, ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. माझे पूजनीय वडील दिवंगत कुमार दिलीप सिंह जुदेव यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य सनातन संस्कृती, राष्ट्रसेवा आणि सामाजिक सलोखा यांसाठी समर्पित केले होते. त्यांच्याच आदर्शांमुळे आणि आशीर्वादांमुळे मी ही मोहीम सातत्याने पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आह. त्यांनी पुढे असेही सांगितले की, हा पुरस्कार त्यांना नवी ऊर्जा प्रदान करतो आणि समाज अन् राष्ट्र यांच्या कल्याणासाठी अविरतपणे कार्य करण्याची प्रेरणा देतो. सनातन संस्कृतीचे रक्षण, सेवा, सुरक्षा आणि सलोखा यांना समर्पित असलेली ही मोहीम भविष्यातही पूर्ण प्रामाणिकपणाने अन् निष्ठेने अविरतपणे चालू राहील.
हे ही वाचा → ख्रिस्ती धर्मांतरितांना मूळ हिंदु धर्मात आणणारे छत्तीसगडचे प्रबल प्रताप सिंह जुदेव ! |
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. राज भूषण चौधरी, प्रखर राष्ट्रवादी संत पू. स्वामी जितेंद्रानंद सरस्वती, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री श्री. जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ राजकारणी श्री. सत्यनारायण जटिया आणि ‘माय होम इंडिया’चे संस्थापक श्री. सुनील देवधर उपस्थित होते.
याआधी हा पुरस्कार ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांना प्रदान करण्यात आला होता.
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !