
पुणे – पुणे विभागातील नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये ४० उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब न दिल्याने ते अपात्र ठरले आहेत. (नियमाचे उल्लंघन करणारे लोकप्रतिनिधी जनतेसमोर काय आदर्श निर्माण करणार ? – संपादक) अपात्र उमेदवारांची सूची संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्यालय येथे दिली आहे. यात पुणे महापालिकेच्या २२, पंढरपूर नगर परिषदेच्या १५ आणि अक्कलकोट नगर परिषदेच्या ३ उमेदवारांचा समावेश आहे. सुनावणीसाठी बोलावल्यावर त्यांनी समाधानकारक खुलासा दिला नाही. निवडणूक खर्च सादर करण्यात कसूर केल्याप्रकरणी ते ३ वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यास अपात्र आहेत, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी दिली.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर