
कोल्हापूर – ज्यांनी आपल्या प्रखर राष्ट्रभक्तीने, लेखणीने आणि क्रांतीकारी विचारांनी संपूर्ण ब्रिटीश साम्राज्याला हादरवून सोडले, अशा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयंती सोहळा ‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र अभ्यासक श्री. आनंद कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले, तसेच श्री. सुरेश कदम यांनी ‘शब्दात क्रांती-स्वरात राष्ट्रभक्ती’ हा वीर सावरकर यांच्यावरील गीतांचा कार्यक्रम सादर केला.
इचलकरंजी येथील ‘नवदुर्गा भजनी मंडळा’चे बजरंग ओतारी आणि मंगलताई लायकर यांनी भजनांचा कार्यक्रम सादर केला. या प्रसंगी महामंडलेश्वर पंचायत निरंजन आखाडा अध्यक्ष मेहंदीपुर बालाजी राजस्थानचे सियाराम गिरि महाराज, श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे व्यवस्थापक श्री. महादेव दिंडे, माजी सैनिक श्री. विजय हारूगले, पन्हाळा येथील डॉ. राज होळकर, इचलकरंजी येथील ज्येष्ठ उद्योजक श्री. दत्ता राणे, हिंदु महासभेच्या महिला आघाडीप्रमुख शीलाताई माने, श्री. संजय कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. नंदकुमार घोरपडे, श्री. मनोहर सोरप, जिल्हाप्रमुख श्री. राजेंद्र तोरस्कर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, श्री. प्रशांत पाटील, श्री. शेखर वीरकर, वैद्या अश्विनी माळकर, पूनमताई सुळगांवकर, ‘हिंदु एकता आंदोलना’चे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे श्री. निरंजन शिंदे, यांसह हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील पद्धतीचा अभ्यास करणार ! – वनमंत्री गणेश नाईक
विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालक यांचे योगदान महत्त्वाचे ! – डॉ. ऋचा औरंगाबादकर
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !