
कोल्हापूर, २ जून (वार्ता.) – पावसाळ्यात कृष्णा-पंचगंगा नद्यांना पूर येऊन पाणीपातळी वाढते. याचा मोठा धोका कोल्हापूर जिल्ह्याला बसतो. कृष्णा नदी पुढे कर्नाटक येथे जाते, त्या अनुषंगाने आलमट्टी धरण, तसेच त्याअगोदर असलेले हिप्परगी धरण यांच्यामुळे निर्माण होणारी महापुरासारखी परिस्थिती उद्भवू नये; म्हणून कर्नाटक सरकारशी सातत्याने समन्वय चालू आहे. गेल्या आठवड्यात कर्नाटक शासनासमवेत उच्चस्तरीय बैठक झाली, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१. पावसाळ्याच्या पूर्वी ग्रामीण भागात असलेले लाकडी पूल, तसेच छोटे पूल यांच्या संदर्भातील माहिती एकत्र करून त्यांची स्थिती अभ्यासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्कालीन यंत्रणेच्या संदर्भातही बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत.
२. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या सूत्रावर बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. कोल्हापूर शहरापासून पुढे असणार्या गावांना प्रदूषणाचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. या संदर्भात महापालिका प्रशासन, तसेच अन्य सर्व संबंधित विभाग यांची प्रत्येकी १५ दिवसांनी बैठक घेऊन उपाययोजना काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’वरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
३. जिल्ह्याचा ६४२ कोटी रुपयांचा विकास आराखडा संमत करण्यात आला असून आराखड्याचा ६० टक्के निधीचा व्यय झालेला आहे. या निधीचे सर्वांना समान वाटप करण्यात येणार आहे.
| जानेवारी महिन्यात राज्यशासनाने गडदुर्गांवरील अतिक्रमणाच्या संदर्भात शासकीय परिपत्रक काढूनही कार्यवाही झालेली नाही’, या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पत्रकाराने लक्ष वेधले असता पालकमंत्र्यांनी सांगितले, ‘‘कोल्हापूर जिल्ह्यातील २ – ३ गडांच्या अतिक्रमणांच्या संदर्भात हा प्रश्न महत्त्वाचा असून या संदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना देऊ.’’ ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर अध्यक्ष, तसेच अन्य पदाधिकारी यांच्या रिक्त जागांकडे लक्ष वेधल्यावर ‘ही पदे यथावकाश भरली जातील’, असे त्यांनी सांगितले. |
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांकडून अभिवादन !
भडगाव (जिल्हा जळगाव) येथे युरियासमवेत अन्य रासायनिक खते घेण्याची शासकीय कृषी केंद्रांतून सक्ती !
मुणगे येथे अणूऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात