सोलापूर विधान परिषद निवडणुकीची घोषणा
१८ जूनला मतदान, २२ जूनला मतमोजणी

सोलापूर – सोलापूर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी ४ जूनपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत ठरवण्यात आली आहे. १८ जून या दिवशी मतदान होणार असून २२ जूनला मतमोजणी होईल. निवडणूक प्रक्रियेसाठी १८ मेपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून तिची काटेकोर कार्यवाही केली जाईल. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस्. कार्तिकेयन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी कार्यरत रहातील.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा