BJP Leader Murder : जयपूरमध्ये भाजपच्या नेत्याची शिरच्छेद करून निर्घृण हत्या

आरोपींना अटक करण्यासाठी ग्रामस्थांचे रस्त्यावर धरणे आंदोलन

भाजपचे नेते रामवतार असवाल (चौकटीत)

जयपूर (राजस्थान) – येथील मनोहरपूर भागात भाजपचे नेते रामवतार असवाल उपाख्य पप्पू यांची शिरच्छेद करून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह भंगाराच्या गोदामात रक्ताच्या थारोळ्यात सापडला.

असवाल हे भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे माजी मंडल अध्यक्ष होते. या घटनेनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी धरणे आंदोलन करत आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली. हत्येचे कारण आणि आरोपी यांचा अद्याप शोध लागलेला नाही.