(म्हणे) ‘प्रशासनाकडून केवळ मुसलमानांच्याच धार्मिक वास्तूंना लक्ष्य केले जाते !’

सांगलीतील ‘समस्त मुस्लिम समाज समिती’चा कांगावा

सांगली, १ जून (वार्ता.) – सांगली महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक वास्तूंवर प्रशासनाने कारवाई केल्यावर, ‘प्रशासन केवळ मुसलमान समाजाच्याच वास्तूंना लक्ष्य करत आहे’, असा जावईशोध लावत ‘समस्त मुस्लिम समाज समिती’ने १ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात बिनबुडाचा आरोप करण्यात आला आहे. (‘चोराच्या उलट्या बोंबा’प्रमाणे स्थिती असणारे उद्दाम धर्मांध ! प्रशासनाने धर्मांधांची सर्वच अनधिकृत बांधकामे भुईसपाट करावीत आणि अनधिकृत बांधकामे करणार्‍यांना कठोर शिक्षाही करावी ! – संपादक)

या निवेदनात म्हटले आहे की, काही जातीयवादी व्यक्ती समाजात जातीय तेढ निर्माण करत आहेत आणि त्यांच्या दबावाखाली येऊन प्रशासन एकांगी अन् अनधिकृत कारवाई करत आहे. मुसलमान समाजाच्या वास्तूंना कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता रात्रीच्या वेळी पाडले जात आहे. (बांधकाम अनधिकृत आहे, याविषयी का बोलत नाही ? – संपादक) सांगली जिल्ह्यात अनेक सार्वजनिक आणि मोकळ्या जागांवर अनधिकृत धार्मिक बांधकामे उभी राहिली आहेत. जिल्ह्यातील विविध धर्मांच्या अनेक अनधिकृत धार्मिक वस्तू, मंदिरे आणि इतर बांधकामे अस्तित्वात आहेत; मात्र आम्ही कधीही तक्रार केली नाही. (हिंदूंनी तक्रार केल्यावर धर्मांधांना पोटशूळ का उठतो ? – संपादक) मुसलमानांनी ‘जर आमच्यावर कारवाई झाली, तर जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जाईल’, अशी गर्भित चेतावणी देत प्रशासनावरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला.