
उरण (जिल्हा रायगड) – रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित तिसर्या मुंबईच्या प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी, भूमीपुत्र आणि ग्रामस्थ यांच्या नवनगरविरोधी समितीच्या वतीने ७ जून या दिवशी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. चिरनेर, उरण येथील शहीद स्मारकाजवळ दुपारी ४ वाजता ही सभा होईल. तिसर्या मुंबई प्रकल्पाचे संभाव्य परिणाम, भूमी संपादन आणि स्थानिक यांच्या हक्कांविषयी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
नवनगरविरोधी समितीच्या प्रसिद्धीपत्रकात तिसर्या मुंबईच्या नावाखाली रायगड जिल्ह्यातील सुपीक शेती, गावे, घरे आणि स्थानिक यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विकासाच्या नावाखाली शेतकर्यांच्या भूमी संपादित करून स्थानिकांना विस्थापित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समितीने केला आहे.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !