उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची चेतावणी

बिजनौर (उत्तरप्रदेश) – भारतीय परंपरा आणि संस्कृती नेहमीच धर्माच्या रक्षणाचा संदेश देते. ‘जो धर्माचे रक्षण करतो, धर्म त्याचे रक्षण करतो.’ धर्माचे रक्षण करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे आणि जर समोर ‘खर’ आणि ‘दूषण’ (रामायणातील असुर) यांसारख्या प्रवृत्ती असतील, तर शस्त्र उचलण्याची वेळही येऊ शकते, असे मार्गदर्शन योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. येथे पाकिस्तानातून आलेल्या विस्थापित हिंदु कुटुंबांना भूमीचे मालकी अधिकार देण्याशी संबंधित कार्यक्रमात ते बोलत होते.
🚨 Uttar Pradesh CM Yogi Adityanath in Bijnor:
"𝐈𝐟 𝐝𝐞𝐦𝐨𝐧𝐬 𝐥𝐢𝐤𝐞 𝐊𝐡𝐚𝐫𝐚 𝐚𝐧𝐝 𝐃𝐮𝐬𝐡𝐚𝐧𝐚 𝐬𝐭𝐚𝐧𝐝 𝐛𝐞𝐟𝐨𝐫𝐞 𝐮𝐬, 𝐰𝐞 𝐡𝐚𝐯𝐞 𝐧𝐨 𝐜𝐡𝐨𝐢𝐜𝐞 𝐛𝐮𝐭 𝐭𝐨 𝐩𝐢𝐜𝐤 𝐮𝐩 𝐰𝐞𝐚𝐩𝐨𝐧𝐬."
Referring to the Surya Chauhan murder case (Ghaziabad), CM Yogi… https://t.co/FS6a1dn1oS pic.twitter.com/sWaTfDmUyB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 1, 2026
मैत्रीच्या नावाखाली सुरा चालवण्याच्या घटना सहन करणार नाही !
गाझियाबादच्या चर्चित ‘सूर्या चौहान हत्याकांडा’चा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मैत्रीच्या नावाखाली सुरा चालवणे’ अशा घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. गाझियाबादच्या या घटनेने समाजाला हादरवून सोडले असून जर कुणी आपल्या मुलांना योग्य दिशा देऊ शकत नसेल, तर ती त्यांची मोठी चूक आहे. राज्य सरकारची संवेदना नेहमीच सामान्य आणि कायद्याचे पालन करणार्या नागरिकांसमवेत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेशी खेळणार्यांविरुद्ध सरकार कठोर भूमिका घेईल अन् अशा घटना कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत.
गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी करणारे तिला प्राणी म्हणून पहातात !
गोवंश संरक्षणाच्या सूत्रावर मुख्यमंत्री म्हणाले की, काही लोक गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी करतात; पण त्याच वेळी तिला केवळ ‘प्राणी’ म्हणून संबोधतात. भारतात गोमातेबद्दलची श्रद्धा आणि सन्मानाची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. उत्तरप्रदेशात गोहत्येविरुद्ध कठोर कायदे लागू असून सरकार या विषयावर कोणतीही ढिलाई खपवून घेणार नाही, असे त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले.
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध