सातारा : अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईची मागणी !

सातारा, १ जून (वाता.) – वाढत्या अमली पदार्थांच्या विक्रीमुळे युवा पिढी व्यसनाधीन होऊन गुन्हेगारी वाढते. अमली पदार्थां विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)

निवेदनामध्ये म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये गांजा, चरस, हेरॉईन, ब्राऊन शुगर, अफू, कोकेन, मेफेड्रोन यांसारख्या अमली पदाथाची विक्री वाढत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालये, तरुण मंडळे, पानटपर्‍या आणि अवैध मद्य विक्रीच्या ठिकाणी अमली पदाथाची विक्री होत आहे. वयाच्या १५-१६ व्या वष युवक-युवती या व्यसनांच्या विळख्यात अडकत असल्याने भविष्यात मोठे सामाजिक संकट निमाण होऊ शकते. अमली पदार्थांच्या सेवनामुळे जिल्ह्यामध्ये हत्या, चोरी, अपहरण, संघटित गुन्हेगारी असे विविध प्रकारचे गुन्हे वाढत आहेत. पोलीस दलाने याकडे लक्ष देऊन अमली पदार्थ विक्रेत्यांचे समूळ उच्चाटन करावे. १ महिन्यात यावर प्रभावी कारवाई झाली नाही, तर जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक आणि नागरिक यांचा विराट मोर्चा जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयावर काढण्यात येईल.