
निपाणी – स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ नाव नसून प्रचंड विचारशक्ती आहे. देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य आणि कुटुंबाचे सुख पणाला लावले. स्वातंत्र्यानंतरच्या तत्कालीन सत्ताधार्यांनी सावरकर यांना उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा विचार हा काल, आज आणि उद्याही हिंदु समाजाला प्रेरणादायी ठरत राहील, असे मत ‘श्रीराम सेने’चे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केले. २८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्रीराम सेना (कर्नाटक) निपाणी तालुका विभागाच्या वतीने गांधी चौकातील व्यंकटेश मंदिरात आयोजित ‘हिंदु एकता सभे’त ते बोलत होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेंद्र अहिरे यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. श्री. राजेश आवटे यांनी सूत्रसंचालन केले.
श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद’मधून हिंदु युवतींना सोडवण्यासाठी हिंदु जनजागृती समिती कार्य करत आहे. ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या युवतींना सोडवण्यासाठी श्रीराम सेनेने ‘हेल्पलाईन’ सिद्ध केली असून त्याद्वारे ४ सहस्र ८०० युवतींना सोडवण्यात आले आहे. राजकारणाचे हिंदुकरण झाले, तर या देशापुढील सर्व समस्या सुटतील.’’
संभाजी महाराज चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, जत्राट वेस येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बसवेश्वर चौकात जगज्योती बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वहाण्यात आली. त्यानंतर व्यंकटेश मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, भारतमाता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमांचे पूजन अन् दीपप्रज्वलन करून ध्येयमंत्राने सभेचा प्रारंभ करण्यात आला. या सभेला प.पू. सत्यप्रमोद सरस्वती स्वामीजींचे दिव्य सान्निध्य लाभले. प्रमुख अतिथी म्हणून श्री. महेंद्र अहिरे, श्री. शिव भंते, श्रीमती अनिता बनगे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. नितीन काकडे, श्री. रोहन कोठीवाले, श्री. सूरज राठोड, श्री. गजू कट्टीकर आणि श्री. रामभाऊ मेथे उपस्थित होते.
या सभेसाठी श्रीराम सेनेचे चिकोडी जिल्हाध्यक्ष श्री. अमोल चेंडके, सर्वश्री बबन निर्मळे, अजित पारले, विशाल जाधव, श्रवण कोळी यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्रीराम सेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती यांच्यासह २०० हून अधिक धर्मप्रेमी हिंदू उपस्थित होते.
सावरकरांच्या विचारांतून अखंड हिंदु राष्ट्र उभे करणे, हाच सर्व समस्यांवरील उपाय ! – महेंद्र अहिरे, हिंदु जनजागृती समिती
‘लव्ह जिहाद’, गोहत्या, धर्मांतर यांसारख्या अनेक समस्यांनी हिंदु समाजाला ग्रासले आहे. समाज निद्रिस्त राहिल्यामुळे हे संकट वाढत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन अखंड हिंदु राष्ट्र उभे करणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे.
विशेष
१. श्रीराम सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी त्यांच्या भाषणात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा आवर्जून उल्लेख केला.
२. संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने सभेची सांगता झाली.
३. एका युवतीने ‘लव्ह जिहाद’मधून हिंदु युवतीचे रक्षण केले, याविषयी तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !
भाजपचे आमदार शंकर जगताप यांचे सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र