आंबेगाव (पुणे) येथे ‘वैद्यचैत्राली फाऊंडेशन’कडून विनामूल्य ‘शिवसृष्टी दर्शन’ उपक्रम !

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती आदर म्हणून आपण त्यांचा इतिहास, गड-दुर्गांची माहिती, शिवचरित्र यांचा प्रचार-प्रसार करून समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवायला हवा. शिवकालीन वास्तू, वास्तूकला आणि शिल्पकला, मंदिरे ही नुसत्या डोळ्यांनी न पहाता अभ्यासाच्या दृष्टीने पहावीत. यातून त्या काळातील लोकांची सौंदर्यदृष्टी लक्षात येते. निसर्गातील प्रतिके, संरक्षणासाठी केलेली योजना दिसते. प्रत्येक शिवभक्ताने हा प्रकल्प पहावा असे मत युवा इतिहास अभ्यासक अमोल वैद्य यांनी पर्यटकांशी संवाद साधतांना मांडले. चैत्राली फाऊंडेशनकडून आंबेगाव (पुणे) येथील ‘शिवसृष्टी दर्शन’ उपक्रमाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी शिवसृष्टी प्रकल्पाचे विश्वस्त श्री. गणेश पुरंदरे, अनिल वळसंगकर यांचा शाल आणि ‘शी इज’ हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा इंदोरे अन् सक्रीय सदस्य या वेळी उपस्थित होते.
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती !