बांगलादेशातील सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता सुमन कुमार रॉय यांचे विधान

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात तारिक रहमान यांचे सरकार स्थापन होऊन १०० दिवस झाले. यानिमित्त त्यांच्या कामाचा तेथील हिंदूंच्या जीवनावर काय परिणाम झाला, याविषयी बांगलादेशातील सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि ‘बांगलादेश सनातन पार्टी’चे महासचिव श्री. सुमन कुमार रॉय यांनी सांगितले की, नवीन सरकारने सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर चिंतेचा विषय बनली आहे. देशाच्या विविध भागांमध्ये हत्या, बेपत्ता होणे, बलात्कार, दरोडा आणि छळवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः अल्पसंख्यांक हिंदूंना वाढत्या असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. यांतर्गत धार्मिक भावनांच्या नावाखाली होणारी आक्रमणे, तोडफोड, अपमान, भूमींवरील अतिक्रमण, मंदिरांचा ताबा आणि खंडणी वसुली यांसारख्या प्रकारांचा समावेश आहे.
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
कराचीमधील आक्रमणामागे हात असल्याचा आरोप भारताने फेटाळला !
France Heatwave : फ्रान्समध्ये उष्णतेमुळे ४ दिवसांत १ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू