आज सातारा येथे ‘स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींचा मेळावा’ !

स्वातंत्र्यवीर सावरकर

सातारा, २७ मे (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३व्या जयंतीनिमित्त ‘अखिल भारत हिंदु महासभा’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच’ यांच्या वतीने २८ मे या दिवशी सकाळी ११ वाजता सुपनेकर सभागृह येथे ‘सावरकरप्रेमींचा मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या वेळी सहकार, विधी, उद्योग, कला, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘अखिल भारत हिंदु महासभे’चे सातारा जिल्हाध्यक्ष धनराज जगताप यांनी दिली.

धनराज जगताप म्हणाले की, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सातारा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा ‘रा.ना. गोडबोले न्यासा’चे अध्यक्ष अच्युतराव गोडबोले उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अखिल भारत हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता दत्तात्रय सणस भूषवणार आहेत. या वेळी ‘स्वा. सावरकर विचार मंच’चे अध्यक्ष दुष्यंतराव जगदाळे उपस्थित रहाणार आहेत. हिंदुमहासभेचे प्रवक्ते आनंदजी कुलकर्णी ‘स्वा. सावरकर यांच्या रत्नागिरी पर्वा’वर विशेष मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमास सावरकर भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे.