लातूर येथे बैलजोडी खरेदी करणार्‍या शेतकर्‍यावरच गुन्हा नोंद !


लातूर –
शेतीसाठी बैलजोडी खरेदी करून गावाकडे निघालेल्या शेतकर्‍यावरच पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. (पोलीस अशा प्रकारे काम करत असतील, तर जनतेचा पोलिसांवर कधीतरी विश्वास बसेल का ? – संपादक) भीमराव सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा महेश सूर्यवंशी यांनी धाराशिव येथून बैलजोडी खरेदी केली होती. कागदपत्रे असूनही काही जणांनी त्यांना अडवले, तर पोलिसांनी कत्तलीच्या संशयावरून कारवाई करत जनावरे जप्त केली. पशूसंरक्षण कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.