आतापर्यंत एकूण १३ जणांना अटक !

पुणे – ‘नीट २०२६’ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयने २७ मे या दिवशी आणखी २ आरोपींना अटक केली. लातूरचे डॉ. मनोज शिरूरे यांनी एका ‘कोचिंग सेंटर’च्या मालकाच्या (जो स्वतःही आरोपी आहे) मुलासह ३ विद्यार्थ्यांना आरोपी पी.व्ही. कुलकर्णी यांच्याकडून रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिका मिळवून दिल्या होत्या. डॉ. शिरूरे यांना अटक करण्यात आली. तेजस शहा हे पुणे येथील डॉ. ‘अभंग प्रभु मेडिकल अकादमी’ या शिकवणीवर्गामध्ये भौतिक शास्त्राचे प्राध्यापक असून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना नीट परीक्षेतील भौतिकशास्त्राचे फुटलेले प्रश्न आरोपी मनीषा हवालदार यांच्याकडून मिळाले होते. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १३ जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने आतापर्यंत यासंबंधी वेगवेगळ्या ४९ ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे.
प्रश्नपत्रिका फुटीचे सर्वांत मोठे केंद्र महाराष्ट्र आहे. येथूनच राजस्थान आणि इतर राज्यांमधील विद्यार्थ्यांपर्यंत ‘क्वेश्चन बँक’ पोचली. अन्वेषण यंत्रणा आता त्या सर्व पालकांची सूची सिद्ध करत आहे, ज्यांच्या बँक खात्यातून प्रा. शिवराज मोटेगावकर, प्रा. पी.व्ही. कुलकर्णी, तसेच मनीषा वाघमारे यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित झाले होते.
प्रा. मोटेगावकर आणि प्रा. कुलकर्णी यांनी पालकांना प्रश्नपत्रिका १० ते १२ लाख रुपयांना विकली !
प्रा. पी.व्ही. कुलकर्णी आणि प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका १० ते १२ लाख रुपयांपर्यंत विद्यार्थ्यांच्या पालकांना विकली. प्रश्नपत्रिका विकत घेण्यासाठी अनेक पालकांनी या दोघांना ऑनलाईन रक्कम पाठवल्याची माहिती आहे. प्रश्नपत्रिका घेतलेल्या पालकांनी पुढे आपल्या वर्तुळातील अन्य लोकांना २ ते १० लाख रुपयांपर्यंत ती विक्री केल्याचे समजते. शहरातील काही आधुनिक वैद्यांनी आपल्या मित्रांच्या पाल्यांना ही प्रश्नपत्रिका पुरवली. प्रा. मोटेगावकर यांच्या भ्रमणभाषमध्ये ही प्रश्नपत्रिका नीट परीक्षेच्या आधीच आल्यानंतर प्रा. कुलकर्णी आणि मोटेगावकर यांनी मिळून ही प्रश्नपत्रिका विकल्याचा सीबीआयला संशय आहे.
सीबीआयने लातूर येथील ५ आधुनिक वैद्यांची चौकशी केली आहे. यातील चौघांच्या मुलांनी ‘नीट’ परीक्षा दिली असून यामुळे प्रश्नपत्रिका खरेदीत त्यांचा समावेश असल्याचा संशय सीबीआयला आहे.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक