वाघोलीतील उद्योजकाची फसवणूक

पुणे – दुबईमध्ये ‘फूड डिलिव्हरी’ (अन्नपदार्थ पोचवण्याची सेवा) आणि ‘कार रेंटल’ (भाड्याने चारचाकी वाहन मिळणे) यांचे ‘कॉल सेंटर’ (ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरवणारा विभाग) चालू करण्याचे आमीष दाखवून वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ सहस्र रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी उद्योजकाने दिलेल्या तक्रारीच्या अन्वये खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. दुबईमधील नामांकित आस्थापनाच्या नावाने कर्णावतीमध्ये (अहमदाबादमध्ये) बनावट कॉल सेंटर चालवून नागरिकांची फसवणूक करणार्‍या तिघांना खराडी पोलिसांनी कर्णावती येथून कह्यात घेतले. खुशी कौशल (वय २३ वर्षे), तुषार पटेल (वय ३२ वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह अन्य ४ साथीदारांवरही गुन्हा नोंदवला आहे.