जुन्नर (पुणे) येथे गोवंश हत्या रोखण्यासाठी नगराध्यक्षांकडून प्रशासनाला आदेश !

जुन्नर – शिवजन्मभूमी जुन्नर (जिल्हा पुणे) येथील लोकनियुक्त प्रथम महिला नगराध्यक्षा सौ. सुजाता काजळे यांनी गोवंशहत्या रोखण्यासाठी प्रशासनाला कडक आदेश दिले आहेत. त्यांचा हा निर्णय कौतुकास्पद असून या धाडसी निर्णयामुळे त्यांचे सकल हिंदु समाज आणि जुन्नरवासियांकडून अभिनंदन केले जात आहे. राज्यातील इतर लोकनेत्यांनीही त्यांचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात गोवंश हत्येच्या संदर्भात असेच ठाम निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत सकल हिंदु समाजाकडून व्यक्त केले जात आहे.

संपादकीय भूमिका

असे आदेश का द्यावे लागतात ? प्रशासन स्वत:हून कारवाई केव्हा करणार ?